चिनाब
चिनाब : चेनाब, चीनाब. पंजाबच्या पाच नद्यांपैकी एक. लांबी सु. ९६० किमी.; ३०० मी. उंचीवरील प्रदेशातील जलवाहनक्षेत्र सु. २७,५२९ चौ. किमी.; पंजाब हिमालयाच्या लाहुल भागात ४,८९१ मी. वरील बारालाचा खिंडीच्या आग्नेयीस व वायव्येस उगम पावणाऱ्या अनुक्रमे चंद्रा व भागा या प्रवाहांच्या २,२८६ मी. उंचीवरील तंडी येथील संगमापासून चंद्रभागा किंवा चिनाब वाहू लागते.